कै.बळीराम विठ्ठल राणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 79 वर्ष होते.त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला.त्यांच्यावर मोर्बै गावच्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्च्यात पत्नी,तीन मुले,सूना,जावंई,नातवंडे,पातवंडे असा परीवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.2 ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र उध्दर रामेश्वर येथे होणार आहे तर उत्तरकार्य शुक्रवार दि.5 ऑगस्ट रोजी राहत्या घरी होणार आहेत.यावेळी सकाळी 10 ते 11 प्रवचनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

कै.बळीराम विठ्ठल राणे यांना सामाजिक कार्याची खूपच आवड होती.त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी याअगोदर माथेरान डोंगर रोज पायी जा ये करायचे.त्यांना परीसरातील नागरिक दादा म्हणून हाक मारायचे.त्यांच्या निधनामुळे मोर्बे गावावर शोककळा पसरली आहे.