जन्म. १६ मे १९८३ रोजी पुणे येथे.
अस्ताद काळे चे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. अस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने पुढचं पाऊल, सरस्वती, असंभव, वादळवाट, अग्निहोत्र या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्याने फर्जंद, दमलेल्या बाबांची कहाणी, प्लॅटफॉर्म, जंगजौहर या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. त्याच्या मालिकांना, त्यामधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे. आस्ताद काळेने अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले पण खूप कमी लोकांना माहित आहे की आस्तादने १७ वर्ष गाण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. असे असतानाही तो गेल्या १७ वर्षापासून गाण्यापासून लांब आहे. ‘सिंगिंग स्टार’ या म्युझिक रियालिटी शो मुळे त्याला पुन्हा गाणं गाण्याची संधी मिळाली होती. या कार्यक्रमात सावनी रविंद्र त्यांच्या सोबत होती. हे दोघेही फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होत. या दोघांनी कॉलेज मध्ये असताना एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता.
अस्ताद काळेने बिग बॉस मराठी या कार्यक्रमात भाग घेतला होता. अस्ताद काळे खूप चांगला गायक देखील आहे. त्याच्या अभिनयाप्रमाणेच प्रेक्षक त्याची गाणी देखील पसंद करतात. आस्ताद काळेने नुकतेच अभिनेत्री स्वप्नाली पाटीलशी लग्न केले आहे.