दि.१५ मे २०२२ रोजी एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन आणि लीला म्हात्रे प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने मोफत मोडिफाइड कुबडी संच व व्यवसाय अनुदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.श्री.सचिन गोसावी – तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीवर्धन यांनी स्विकारले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लीला म्हात्रे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.निशांत डी. म्हात्रे, विश्वस्त रमेश ओवलेकर, संजय पाटील यांनी उपस्थित दिव्यांगाना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष समीर रिसवुड, पत्रकार संदीप लाड आणि कुणबी युवक अध्यक्ष राजा टाकले हे उपस्थित होते. दोन कुबड़यांवर चालणाऱ्या दिव्यांग व्यक्तीने स्वावलंबी व्ह्यवे यासाठी ४ दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी ४०००रु व्यवसाय अनुदान ज्यामध्ये भजिपाला खरेदी करून विक्री करणे/फळ विक्री/चॉकलेट गोळ्या खरेदी विक्री इ.व्यवसाय एका मोडिफाइड कुबडी संचावर बसून करता येईल असा लाभ देण्यात आला. ते चार दिव्यांग व्यक्ति मैनुद्दीन गजगे, नथूराम कांबळे, आयशा मुकादम व रिदवान माटवनकर असे लाभार्थी पात्र ठरले. कार्यक्रमंती तहसीलदार श्री. सचिन गोसावी अध्यक्षीय भाषणात उपस्थित दिव्यांगांना अमूल्य मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी कुणबी युवक संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमच्या शेवटी एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश नाक्ती, उपाध्यक्ष मुईद सरखोत, सचिव उदय माळी, खजिनदार नाझनीन करवेकर,सल्लागार संतोष पारधी,सदस्य सुनील गायकर, हेमंत वाघे आणि कासार मैडम यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.