जन्म.२९ जून १९७५ होशियारपुर येथे.
उपासना सिंह यांनी पंजाब विश्वविद्यालयातून ड्रामटिक आर्ट मध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. उपासना सिंह यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासून दूरदर्शन वर प्रोग्राम करण्यास सुरुवात केली.त्यांनी बॉलीवूड मध्ये येण्या आधी अनेक हिन्दी, उर्दू, व पंजाबी नाटकात कामे केली आहेत. उपासना सिंह यांनी आपल्या करीयरची सुरुवात राजस्थानी चित्रपट‘बाई चली सासरिये’पासून केली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला.पुढे त्यांनी असरानी यांच्या बरोबर निर्माता “के सी बोकड़िया”यांनी बनवलेल्या ‘अहमदाबाद नो रिक्क्षावालो’ व पंजाबी चित्रपट ‘बदला जट्टी दा’ यात त्यांनी अभिनय केला. उपासना सिंह यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘आज की ताकत’ होता.जो १९९२ मध्ये प्रदर्शित झाला.
यात त्यांना डाकूचा रोल करायला मिळाला होता. पुढे त्यांनी परत ‘रामवती’या चित्रपटात डाकूची भूमिका केली या चित्रपटानंतर त्यांना काही पत्रकारांनी लेडी अमिताभ बच्चन ची उपमा दिली होती. ‘फूलवती’, ‘मैं हूं गीता’ ‘गंगा का वचन’, ‘इंसाफ की देवी’ ‘खून का सिंदूर’ या चित्रपटानी ‘लेडी अमिताभ’ ही उपमा खरी ठरवली. व त्या एक अशी अभिनेत्री बनल्या ज्यांनी तीन भाषेत सुपरहिट चित्रपट दिले. उपासना सिंह यांनी पुढे इमोशलन व एक्शन चित्रपट सोडून कॉमेडी मध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. उपासना सिंह यांनी यांनी‘जुदाई’चित्रपटातील केलेला अभिनय खूपच भावला होता. त्या चित्रपटातील डायलॉग ‘अब्बा डब्बा जब्बा’ हा खूपच गाजला होता. ‘सोनपरी’मालीके मधील ‘कालीपरी,‘कॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा’मधील ‘बुआ’,‘माय फ्रेंड गणेशा’ची ‘गंगूताई’अशा उपासना सिंह यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी सुनील ग्रोवर यांच्या ‘क्रिकेट कॉमेडी शो’ मध्ये पण काम केले आहे. उपासना सिंह यांनी १०० हून आधीक मालिका व चित्रपटात अभिनय केला आहे. उपासना सिंह यांनी ४२ हून अधिक भोजपुरी चित्रपटात काम केले.
उपासना सिंह यांनी हिंदी बरोबरच भोजपुरी, पंजाबी, मराठी, राजस्थानी, गुजराती चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांनी ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेचे अभिनेते नीरज भारव्दाज यांच्या सोबत २००९ मध्ये लग्न केले होते. पण लग्नाच्या काही वर्षांतच दोघांमध्ये वाद झाला होता व ते वेगळे राहू लागले. पण २०१८ मध्ये ते परत एकत्र राहू लागले.
डर, जवानी ज़िंदाबाद, लोफर, जुदाई, मैं प्रेम की दीवानी हूँ , मुझसे शादी करोगी , ऐतराज़ , ओल्ड ईस गोल्ड , माय फ्रेंड गणेश , गोलमाल रिटर्न्स, जुड़वाँ 2 व हंगामा हे त्यांचे काही चित्रपट होत.
राजा की आएगी बरात, परी हूँ मैं, मायका, ये मेरी लाइफ है, बानी, सोनपरी, संतोषी व कपिल शर्मा का शो, क्रिकेट कॉमेडी शो, नच बलिये सिझन 8, जियो धन धना धन, कैरी ऑन जट्टा 2 या त्यांच्या काही टीव्ही मालिका होत.