जन्म. १२ एप्रिल १९१० पंजाबातील (आता पाकिस्तानातील) नरौला येथे.
किदार शर्मा हे एकाच वेळी निर्माता, निर्देशक, सिनेमा फोटोग्राफर, अभिनेता, पटकथा लेखक व गीतकार म्हणून काम करत असत. किदार शर्मा यांचे शिक्षण अमृतसर येथे झाले.
१९३३ साली देवकी बोस दिग्दर्शित पुराण भगत चित्रपट त्यांनी बघितला आणि चित्रपट सृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. या साठी ते कोलकाता येथे गेले, त्या काळी फिल्म निर्मातीचे कोलकाता हे मोठे केंद्र होते. कोलकात्यात त्यांची भेट मार्डन थिएटरचे दिनशा रनी यांच्या बरोबर झाली. किदार शर्मा यांची चित्रपटा बद्दल असलेली आवड बघून किदार शर्मा यांना विचारले की काम कराल का ?
किदार शर्मा यांनी उत्तर दिले की मी अभिनय, गीत लेखन, कहानी लेखन हे काहीही काम करू शकतो,पण दिनशा रनी यांनी सांगितले की त्यांना पोस्टर बनवणाऱ्या पेंटरची गरज आहे. किदार शर्मा यांना चित्रकला येत असल्याने ते पोस्टर बनवण्यासाठी तयार झाले. पुढे ते कॅमेरा मॅन म्हणून काम करू लागले. व १९३४ साली आलेला चित्रपट “सीता” हा सिनेमाटोग्राफर किदार शर्मा म्हणून पहिला चित्रपट ठरला. पुढे किदार शर्मा यांनी न्यू थिएटरच्या “इंकलाब” चित्रपटात किदार शर्मा यांनी एक छोटी भूमिका केली होती. किदार शर्मा यांनी “पुजारिन”, “विद्यापति”, “बड़ी दीदी”, “नेकी और बदी” या चित्रपटात काम केले. पण ते अभिनेता म्हणून प्रभाव पाडू शकले नाहीत,त्या मुळे त्यांनी चित्रपट सृष्टीतील इतर कामात लक्ष दिले. १९३६ साली आलेला “देवदास” हा चित्रपट किदार शर्मा यांच्या करियर मधील महत्वाचा ठरला. या चित्रपटासाठी त्यांनी पटकथाकार व गीतकार म्हणून काम केले. या चित्रपटा नंतर “औलाद”, “जोगन” व “चित्रलेखा” या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. जेष्ठ अभिनेते राजकपूर यांनी किदार शर्मा यांचे असिस्टट म्हणून काम केले होते. किदार शर्मा यांचा स्वभाव खूपच कडक होता. राजकपूर यांच्या एका छोट्या चुकी साठी त्यांनी थप्पड मारली होती. राजकपूर शिक्षण सोडून रंगभूमी आणि चित्रपटांत करिअर करू पाहत होते. त्यांचा एकूण कल पाहून पृथ्वीराज यांनी त्यांना किदारजींच्या ताब्यात दिलं आणि ‘चित्रपट बनविण्याची खुबी शिकून घे’ म्हणाले. एकदा एक कॅरेक्टर आर्टिस्ट सीन देत होता. त्याला मोठय़ा मिशा होत्या. स्वत:त रमलेल्या राजनं क्लॅप दिला खरा; पण तो इतक्या जवळून दिला, की क्लॅपच्या दोन पट्टय़ांत त्या नटाच्या मिशा अडकल्या व त्या निघाल्या! किदार शर्मा यांचा राग अनावर होऊन त्यांनी राजकपूर यांना एक थप्पड लगावली. तसेच “हमारी याद आएगी” या चित्रपटाच्या सेटवर त्यांनी अभिनेत्री तनूजा यांना त्यांच्या चुकी साठी थप्पड मारली होती. किदार शर्मा यांनी “नील कमल” या चित्रपटात पहिल्यादा राजकपूर व अभिनेत्री मधुबाला यांना संधी दिली होती. १९४९ मध्ये किदार शर्मा यांनी “नेकी और बदी” चे दिग्दर्शन केले होते, या चित्रपटाला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले होते. पुढे त्यांच्या लिहाजा चित्रपटासाठी त्यांनी रोशन यांना संगीतकार म्हणून संधी दिली. त्यांनी भारत भूषण यांना “चित्रलेखात” काम करून दिले जेव्हा भारत भूषण कामाची गरज होती. त्यांनी लहान मुलांच्या साठी “जलदीप”, “गंगा की लहरें”, “गुलाब का फूल”, “२६ जनवरी”, “एकता”, “चेतक”, “मीरा का चित्र”, “महातीर्थ” व “खुदा हाफ़िज़” असे चित्रपट बनवले. त्यांचे कौतुक करण्याची पद्धत वेगळी होती,ते कामावर खूष झाले कि चार आणे देत असत, व परत चागलं काम झाले की आठ आणे देत असत,याचा अनुभव राजकपूर, दिलीप कुमार, नरगिस, गीता बाली, गायिका मुबारक बेगम व संगीतकार रोशन अशा अनेक जणांनी घेतला होता. किदार शर्मा ५० वर्षे बॉलीवूड मध्ये सक्रीय राहिले. किदार शर्मा यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.