रायगड जिल्ह्यात वृद्धप काळ हा चांगल्याप्रकारे घालविता यावे यासाठी अनेक स्व्यंसेवी संस्थामार्फत अनेक प्रकारचे वृद्धाश्रम आहेत.जिल्हयात असलेल्या वृद्धाश्रम व तेथे कार्यरत असणारे कर्मचारी यांची माहिती एकत्रित करून शासनाला सादर करण्याबाबत पुणे येथील समाजकल्याण आयुक्त यांनी निर्देश दिले आहेत.
रायगड जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या खासगी वृद्धाश्रम यांच्या व्यवस्थापक यांना आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांनी आव्हान केले आहे की,त्यांच्या वृद्धाश्रमाची माहिती तपशील प्रमाणे समाज कल्याण विभाग,रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे समक्ष आपल्या प्रतिनिधी मार्फत तात्काळ सादर करावी अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभाग रायगड यांचा दूरध्वनी क्रमांक 02141-222079 वय संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.
समाज कल्याण विभागास माहिती कळविताना त्यामध्ये वृद्धाश्रमाचे पूर्ण नाव,पत्ता,दूरध्वनी क्रमांक, संस्थेचे नोंदणी क्रमांक व दिनांक,वृद्धाश्रम जागेचा तपशील,वृद्ध प्रवेशित संख्या,प्रति वृद्ध,प्रति माह आकारण्यात येणारे शुल्क,वृद्धाश्रम मधील कार्यरत कर्मचारी यांचे नाव, पदनाम,शिक्षण, व नियुक्ती दिनांक या मुद्द्यावर माहिती आवश्यक आहे.सदरची माहिती राज्य मानवी हक्क आयोग यांना सादर करणे आहे.
तरी लवकरात लवकर सदर माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करण्याचे आव्हान समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.