खोपोली: कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील लवजी स्थानकात ट्रेन मधून उतरत असताना, एका तरुणीचा तोल गेल्याने ती खाली पडली, पण त्या क्षणी ट्रेनमध्ये प्रवासी असणारे पत्रकार विनीत जाधव यांनी प्रसंगावधान राखून सदर तरुणीस प्लॅटफॉर्मवर ओढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. विनीतच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीहून सुटलेली सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई येथे जाणारी ट्रेन लवजी स्थानकात आल्यानंतर एक तरुणी व तिच्या आई ट्रेन मधून उतरत असताना, तरुणीचा तोल जाऊन  प्लॅटफॉर्म व ट्रेनच्या मधल्या भागात हात व पाय जात असतानाच त्याच ट्रेनमधुन प्रवास करीत असणाऱ्या पत्रकार विनित जाधव यांनी प्रसंगावधान राखून त्या तरुणीला तात्काळ पलोटफॉर्मावर ओढले ,त्याक्षणी ट्रेनही सुरु झाली होती. त्या तरुणीची आई प्लॅटफॉर्मवर कोसळली होती. दरम्यान दोघीजणी सुखरूप आहेत. नंतर त्या दोघीजणी रिक्षातून निघून गेल्यामुळे त्यांची नावे समजली नाही.
तरुण पत्रकार विनित जाधव यांचं धाडसाचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.