जन्म. ३ मे १९८५ पुणे येथे.
स्निग्धा मूळची मध्य प्रदेशमधील असली तरी तिने नागपूर, पुणे अन् मुंबईत शिक्षण घेतले आता आगळ्या-वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत असते.२००५ मध्ये हरे कांच की चूड़ियां’ या टीव्ही मालिकांद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या स्निग्धाने पौराणिक ‘सिया के राम’ या टीव्ही सीरियल मध्ये स्निग्धा रामाच्या आईची, अर्थातच कौसल्येची भूमिका साकारली होती.
स्निग्धाने ‘नूपुर’, ‘अवंतिका’, ‘पेशवाई’, ‘ये प्रीत न जाने रीत या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
स्निग्धा अकोलकरने अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. स्निग्धा बऱ्या वर्षांपासून मराठी रंगभूमीशीही संबंधित आहे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्निग्धाचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होते. यासोबतच तिने टीव्ही चॅनेल आणि अनेक टीव्ही जाहिरातींसाठी अँकरिंगचेही काम केले आहे. याशिवाय तामिळसह अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही तिने कामे केली आहेत. स्निग्धाला २०१० मध्ये ‘नंदलाला’ या तमिळ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.
स्निग्धाने तामिळ फिल्म ‘अंजथे’ या आयटम सॉंग केले होते ते खूप गाजले होते. नेटफ्लिक्सवरील वेब सीरीज ‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’ मध्ये ती दिसली होती. स्निग्धाला ट्रेकिंगची आवड आहे आणि तिने हिमालयातील ट्रेकिंग देखील केली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये उद्योजक व श्रीराम रामनाथन बरोबर लग्न केले आहे. ‘बंधन’, ‘सिया के राम’, ‘शमी’ या तिच्या काही मालिका.