अलिबाग
अलिबाग- रेवदंडा मार्गावर बागमळा पेट्रोल पंपाजवळ एसटी व बसले समोरासमोर धडक दिली. या अपघातात ५५ प्रवासी जखमी झाले. जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अलिबाग तालुक्यातील बागमळा येथील शारदा पेट्रोल पंपाजवळ जेएसडब्ल्यू व एसटी बसची समोरा समोर टक्कर झाली. यामध्ये बसमधील 55 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्यांना अलिबाग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.

मुरुड येथेून सुटलेली एसटी अलिबागकडे येत होते. एसटी नागावजवळील बागमाळा येथे आली असता जेएसडबल्यू बस सोबत समोरा समोर जोरदार ठोकर होवून अपघात झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की यात दोन्ही बस मधले 50 हून अधिक जन जखमी झाले आहेत. या अपघातामुळे अलिबाग रेवदंडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.