अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील मोठे बंदर येथे समुद्र किनारी नांगरून ठेवलेल्या जय भवानी या मोठ्या मच्छिमार बोटीला( रविवार दि.29)अचानक भीषण आग लागून भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.
आग लागलेल्या जय भवानी बोटी शेजारी जवळपास बारा ते पंधरा बोटी नांगरून ठेवण्यात आली होती. त्यांना जय भवानी बोटीच्या आगीचा धोका निर्माण झाला होता.मात्र रेवदंडा पोलीस यांच्या सतर्कतेमुळे आग अल्पकाळात आटोक्यात येऊ शकल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


चौल ग्रामपंचायत हद्दीतील कोळी समाजाचे नेते नारायण मुंबईकर यांची रेवदंडा मोठे बंदर येथे पावसाळा असल्याने नांगरून ठेवण्यात आले होते.जय भवानी बोटीला आग लागल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांना माहिती समजताच साळाव येथील जेएसडब्लू कंपनीच्या अग्निशमन दलास पाचारण केले.आगीने भयानक रूप धारण केल्याचे पाहून अग्निशमन दलाच्या दोन गाड्याच्या माध्यमातून जवांनानी आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.
सर्वप्रथम आग बोटीच्या दोन्ही बाजूस पोहचून शेजारी नांगरून ठेवलेल्या बोटीपर्यंत आग पोहचणार नाही.यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर ब्रेक तंत्रज्ञान वापरले. त्यामुळे आजूबाजूलाअसणाऱ्या बोटी ह्या आगीपासून वाचल्या.
आग लागलेल्या बोटीमध्ये नेमके काय साहित्य अथवा रसायन होते.याची कल्पना नसल्याने आग विझविण्यासाठी कोणत्या प्रकारची पध्दत अवलंबवावी हा प्रश्न उपस्थित नागरिकांमध्ये होता.

मात्र जेएसडब्लू अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा अंदाज घेत अंत्यत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळून संपूर्ण आग एक तासाच्या आत आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बोटी बंदरावर नांगरून ठेवण्यात आल्या होत्या.त्यातील आग्रव येथील नारायण मुंबईकर यांच्या मालकीच्या जय भवानी या बोटीचे दुरुस्ती काम सुरू होते.दुपारी अडीचच्या सुमारास त्यातील फायबर साहित्याला आग लागून आगीने भीषण स्वरूप धारण केले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.आणि शेजारी असलेल्या बोटी वाचल्या आहेत.मात्र जय भवानी बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.