जन्म.२६ एप्रिल १९४२
मीनू मुमताज या जेष्ठ नर्तक मुमताज अली यांची मुलगी व बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूद यांची बहिण असलेल्या मीनू मुमताज यांचे खरे नाव मालिकाउन्निसा अली असे होते. जेव्हा त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा अभिनेत्री मीना कुमारी यांनी त्यांचे नाव बदलून मीनू मुमताज केले.तेव्हापासून त्या पुढील सर्व सिनेमांमध्ये मीनू मुमताज याच नावाने ओळखल्या गेल्या.
याच मुमताज अली यांनी, अशोक कुमार-लीला चिटनीस अभिनीत झूला चित्रपटात नृत्य केले होते. मुमताज अली यांना आठ मुले, चार मुले व चार मुली. मीनू मुमताज ही पाच नंबरची बेटी. मुमताज अली यांना दारूचे प्रचंड व्यसन,त्यामुळे घर चालवणेही मुश्कील.
मीनू मुमताज यांनी लहानपणीच डान्सचे प्रशिक्षण घेतले होते. मेहमुद यांनीच मीनू मुमताज यांना बॉलीवूड मध्ये आणले. मीनू मुमताज यांच्या‘सखी हातिम’ या चित्रपटाच्या वेळेस खलनायिका कुलदीप कौर यांची ओळख झाली.
देविका रानी यांनी मीनू यांना बॉम्बे टॉकीजमध्ये डान्सर म्हणून काम करण्याची संधी दिली. मीनू मुमताज यांनी ‘घर घर में दीवाली’ या चित्रपटमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट १९५५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये मीनू मुमताज यांनी गावामध्ये राहणाऱ्या एका नृत्यांगनाची भूमिका साकारली होती. ‘सखी हातिम’ या चित्रपटामुळे मीनू यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
मीनू यांनी गुरु दत्त यांच्या ‘कागज के फूल’,’चौदहवीं का चांद’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ताज महल, घूंघट, इंसान जाग उठा, घर बसाके देखो, गजल, अलीबाबा, अलादीन, धर्मपुत्र आणि जहांआरा या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.
साक़िया आज मुझे नींद नहीं आएगी
बूझ मेरा क्या नाम रे, नदी किनारे गाँव रे
रेशमी सलवार कुरता जाली दा
मैं तुम ही से पूछती हूँ मुझे तुमसे प्यार क्यों है…
‘चौदहवीं का चाँद’ मुजरा, दिल की कहानी रंग लायी है… अशी अनेक गाणी मीनू मुमताज यांच्यावर चित्रित झाली. पुढे मीनू मुमताज यांनी कॉमेडी रोल करण्यास सुरवात केली. पैगाम, घर बसा के देखो या चित्रपटात त्यांची जॉनी वॉकर यांच्याबरोबरची जोडी गाजली. १९६७ साली आलेला पालकी हा चित्रपट मीनू मुमताज यांचा शेवटचा चित्रपट होता. मीनू यांनी दिग्दर्शक सैयद अली अकबर यांच्यासोबत १९६३ मध्ये लग्न केले.
मीनू मुमताज गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडा येथे वास्तव्यास होत्या. तसेच त्या आजारी देखील होत्या. मीनू मुमताज यांचे रोजी २३ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले.
मीनू मुमताज यांचे गाजलेले इतर चित्रपट. मिस इंडिया, माई-बाप, दुश्मन, आशा, यहूदी, मिस्टर कार्टून एमए, कारीगर, कागज़ के फूल, क़ैदी नंबर 911, दुनिया न माने, घूंघट, तू न सही और सही, घराना, ताजमहल, जहांआरा, गबन.