जन्म. ३ मे १९२० पेशावर येथे.
अचला सचदेव यांनी १९३८ मध्ये ‘फॅशनेबल वाइफ’ या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुमारे १५० सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. १९६५ मध्ये आलेल्या ‘वक्त’ सिनेमात त्यांनी बलराज सहानी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या सिनेमातले ‘ये मेरी जोहरा जबी…’ हे त्यांच्यावर चित्रीत झालेले गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहे. अंदाज, अलबेला, संगम, वक्त, हमराज, आदमी और इन्सान, बंधन, मंगल दादा, चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल क्या करे, कभी खूशी कभी गम या सिनेमातल्या भूमिका खूप गाजल्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आई किंवा आजीची भूमिका साकारली होती.प्रेम पुजारी, मेरा नाम जोकर, हरे राम हरेकृष्णा, अंदाज याही सिनेमात त्यांनी काम केले. हृतिक रोशनच्या ‘ना तुम जानो ना हम’ या २००२ मधील सिनेमात त्यांनी अखेरची भूमिका केली. अचला सचदेव यांचे ३० एप्रिल २०१२ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. अचला सचदेव यांना आदरांजली.