जन्म. १७ जुलै १९६९ जोनपुर येथे..
रवि किशन यांचे खरे नाव रविंद्र श्यामनारायण शुक्ला आहे.
रवी किशन यांनी बॉलिवूड आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे.
रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. १९९२ मध्ये रिलीज झालेल्या ‘पितांबर’ या चित्रपटाने रवी किशन यांनी चित्रपटांच्या जगात पदार्पण केले होते. यानंतर त्याने बर्यााच चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर २००३ मध्ये रवी किशन यांनी भोजपुरी इंडस्ट्रीत ‘सईया हमार’ चित्रपटाद्वारे प्रवेश केला.
त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. रवी किशन यांनी बॉलिवूड, भोजपुरी, मराठी, तेलुगु, कन्नड आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. शेवट रवी किशन कन्नड चित्रपट ‘रॉबर्ट’मध्ये दिसले होते. गेल्या वर्षी रवी किशन यांचे तीन चित्रपट रिलीज झालेआहेत, ज्यात एक हिंदी आणि दोन भोजपुरी आहेत. ‘बूंदी रायता’ हा हिंदी चित्रपट असून, दोन भोजपुरी चित्रपट ‘राधे’ आणि ‘सबसे बडा चॅम्पियन’ हे आहेत.
याशिवाय त्यांनी राजकरणात देखील आपली छाप उमटविली आहे. सध्या ते भाजपचे गोरखपूरचे खासदार आहेत.