खोपोली मुंबई पुणे या दोन मोठ्या शहरातील मधले शहर म्हणजे खोपोली शहर, या शहराची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे या शहरातून थेट मुंबईला जाण्यासाठी लोकल ट्रेन सेवा आहे ,त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामानाने लोकल ट्रेन की संख्या अपुरी आहे एक ट्रेन सुटली संपूर्ण एक तासाने दुसरी ट्रेन आहे.

खोपोली कर्जत हा प्रवास वीस मिनिटांचा मात्र काही दिवसापासून हाच प्रवास आता अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत असल्याने, दिवसेंदिवस कंटाळवाणा होत आहे त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना ,विद्यार्थ्यांना पुढील कनेक्टेड  गाडी मिळत नसल्याने ,अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ,रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
     खोपोली वरून सुटणाऱ्या अनेक गाड्या सध्या विलंबाने सुटत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत, अनेकदा गाडी केळवली व पळसदरी या दोन स्थानकादरम्यान कधी कधी काही कारण नसताना ट्रेन बराच वेळ थांबवली जाते तर पुढे पळसदरी ते कर्जत या दरम्यानही अनेकदा ट्रेन थांबविली जाते तर पुढील प्रवास कर्जत पर्यंत रखडत रखडत करावा लागतो परिणामी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या कर्जत मुंबई या कनेक्टेड गाड्या डोळ्यासमोरून सुटतात त्यामुळे अनेक प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वे प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी खोपोली मुंबई प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत जर तात्काळ या बाबत सुधारणा झाली नाही तर कधीही प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो अशी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे