आप तर्फे कार्यतत्पर अधिकाऱ्यांचे कौतुक तर उद्धट अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी व उपोषणाचा इशारा…
नगर परिषद समोर 25 एप्रिल रोजी आप चे बेमुदत उपोषण…
महावीर गार्डनचे प्रवेश शुल्क रद्द करा या मागणीचा सुद्धा केला पुनरुच्चार…
खोपोली…
आम आदमी पार्टी खोपोली शहरात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रभावीपणे कार्य करत आहे. दिनांक 15 मार्च 2023 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकाळी नऊ ते दहा या वेळेत “आप” जन समस्या निवारण शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या लिखित स्वरूपात जाणून घेत असून आम आदमी पार्टीच्या सदस्य नोंदणीसाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खोपोलीकरांना हक्काचा आपल्या अधिकराप्रती दिलासा देणारा उपक्रम आदमी पार्टीच्या माध्यमातून पार पडत आहे. सातत्यपूर्ण दरारोज नागरिकांना उपलब्ध होणारा राजकीय पक्ष व पदाधिकारी यामुळे खोपोलीत जनतेला. व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
खोपोली शहरात ठीकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले असून शहरात काही ठिकाणी या स्पीड ब्रेकर उखडल्यामुळे रस्त्यावर असणारे नट बोल्ट यामुळे अनेक वाहनांचे टायर फुटून नुकसान होत आहे. याची रीतसर तक्रार नगर परिषदेमध्ये आप च्या माध्यमातून नोंदवल्यानंतर नगरपरिषदेचे कार्यतत्पर उप नगर अभियंता तसेच सिटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले नामदेव लगाडे यांनी त्वरित सर्व नटबोल्ट हटवण्याचे काम प्रभावीपणे केलेले आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होणार नाही. या तत्परतेची नोंद घेऊन दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रभारी डॉ.रियाज पठाण, तालुकाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, खोपोली शहर प्रमुख ग्यासूद्दीन खान, सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय ,उपाध्यक्ष शिवा शिवचरण उपस्थित होते. याचवेळी दिनांक 28 मार्च 2023 रोजी खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गौतम भगळे व कार्यालयीन अधीक्षक मीनल जाधव यांनी केलेल्या उद्घट वर्तनाबद्दल त्यांचे निलंबन व्हावे यासाठी तक्रार अर्ज दिलेला असता त्यावर कुठल्याही प्रकारची सुनवाई झाली नसल्याने त्यांच्या निलंबनाची आग्रही भूमिका आम आदमी पार्टीच्या वतीने मांडण्यात आली .या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी नगरपरीषदसमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी आम आदमी पार्टी तर्फे मुख्याधिकारी अनुप दूरे साहेब यांना देण्यात आला. तसेच महावीर उद्यान येथे आकारण्यात आलेले प्रवेश शुल्क रद्द करुन नागरिकांना न्याय द्यावा अशी आग्रही भुमिका आपच्या वतीने मांडण्यात आली. दोन्ही मागण्यांवर निर्णय घेण्याचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी सांगीतले आहे.