मराठी चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपट असे आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘सैराट’हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल चार वर्षे उलटली असली तरी चित्रपटातील गाणी तसेच डायलॉग आजही अनेकांच्या तोंडून सरास ऐकायला मिळतात. ‘सैराट’ या चित्रपटात रिंकू राजगूरु आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होते. रिंकू राजगूरुने चित्रपटात आर्चीची भूमिका साकारली होती तर आकाश ठोसरने परश्याची. त्या दोघांची प्रेम कहाणी पाहणे आजही चाहत्यांना प्रचंड आवडते. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. ‘सैराट’चित्रपटाने ‘दणदणीत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. सैराटला अजय-अतुल यांचे संगीत होते. नागराज मंजूळे यांची उत्कृष्ट पटकथा व लेखक होते. ‘सैराट’ चित्रपटाची जादू पाहून बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता.
धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे नाव ‘धडक’ ठेवण्यात आले होते. या रिमेकमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून दोन्ही स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या हिंदी रिमेकने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.