जन्म.१४ एप्रिल १९८४
रांझणा, तनु वेड्स मनू, रईस, जीरो, मणिकर्णिका व आर्टिकल-15 सारखे एकापाठोपाठ एक मोठे सिनेमे करणारा अभिनेता मोहम्मद झीशान अयुबने बॉलिवूडमध्ये छाप पाडली आहे.
झिशान हा दिल्लीचा रहिवासी आहे. करोरीमल कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. झीशानने २०११ मध्ये आलेल्या नो वन किल्ड जेसिका या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. ‘रांझणा’ या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. यामध्ये त्याने पांडेजींची भूमिका साकारून वाहवा मिळवली. आपल्या छोट्या चित्रपट कारकिर्दीत त्याने दोन डझनहून अधिक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकार म्हणून काम केले. काही काळापूर्वी सैफ अली खान व झीशान अयूब अभिनित तांडव वेब सीरीज आली होती. झिशान याने रसिका आगाशे सोबत लग्न केले असून, रसिका आगाशे एक अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.झिशान त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. रसिका आगाशे झीशान प्रमाणेच स्पष्टवक्तेपणाने बोलते.