जन्म.२७ एप्रिल १८५६
प्रदर्शक वितरक व निर्माते म्हणून गाजलेले जे. एफ. मदान यांचेही प्रेरणास्थान सावे दादा होते.
जे. एफ. मदान यांनी त्या काळी अनेक माहितीपट तयार केले होते. १९०५ सालच्या वंगभंग चळवळीचे जमेल तेवढे चित्रण त्यांनी केले होते. १९०६ साली लो. टिळक यांची कलकत्ता भेट व त्यावळी निघालेली प्रचंड मिरवणूक. त्याचप्रमाणे १९०८ सालातला हैद्राबादचा महापूर, त्यानंतर जॉर्ज मेरी यांची मुंबई भेट, कापसाच्या गोदामाला लागलेली प्रचंड आग, दिल्ली दरबार… यासारख्या अनुबोध पट केले होते. जे. एफ. मदान यांचे २८ जून १९२३ रोजी निधन झाले.