हर घर येथे तिरंगा मोहिमेअंतर्गत दिली माहिती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर यांच्या तर्फे एकाच दिवशी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांमधून हर घर तिरंगा हर दिल तिरंगा या अभियानांतर्गत पदयात्रेतून जनजागृती करण्यात आली.या अमृतमहोत्सवाच्या अभियानात मुरूड तालुक्यातील पाच शाळेची निवड करण्यात आली होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांनी तालुका प्रशासनातील अधिकारी यांना दिलेल्या सूचनेनुसार मुरूड तालुक्यातील शासकीय माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेतील मुलांनी संयुक्तपणे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गावात प्रभातफेरी काढण्यात आली. ही फेरी गावातील विविध मार्गांवरून फिरून सर्वांना तिरंग्याचा इतिहास आणि महत्त्वाची ओळख करून दिली.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे.या प्राश्वभूमीवर आजदी का अमृतमहोत्सव अर्थात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट2022 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.याची जनतेमध्ये जनजागृती व्हावी याबाबत शालेय विद्यार्थ्यांनीसंपूर्ण गावामध्ये”भारत माता की जय”अशा प्रकारे घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली.
यावेळी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी बाबूलाल पाखरे,त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सर्वांना देशाबद्दल अभिमान प्रेम आहे.तरीदेखील भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला असल्याने भारताचा ,आपल्या देशाचा अभियान प्रत्येकाला असल्याने प्रत्येकाने आपल्या घरावर भारतीय ध्वज लावावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीअन्य शासकीय निमसरकारी कर्मचारी यांच्यासाहित गावातून प्रभातफेरी काढली.
हर दिल तिरंगा या अभियानांतर्गत पदयात्रेतून दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या दिवशी नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा याकरिता 75 शाळांमधून त्या त्या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, ग्रामपंचायत सरपंच,सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, महिला बचत गट, युवा मंडळी या सर्वांना सहभागी करून 75 ठिकाणी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या 75 शाळांना केंद्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली.
तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज असून संपूर्ण देशाच्या एकतेचे प्रतीक आहे. यामध्ये समाविष्ट असलेले तीन रंग त्यांच्या वेगळेपणासह प्रत्येकाला सकारात्मक संदेश देतात. नेहमीच राष्ट्रध्वजाचा पूर्ण आदर आणि सन्मान करण्यास प्रोत्साहित केले. तिरंगा हा १३५ कोटी भारतीयांचा अभिमान आहे, तिरंग्याचा अपमान होईल असे कधीही करू नका असे मत प्रशांत ढगे.उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांनी मांडले.




















