लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने रेल्वे स्टेशन खोपोली येथे मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न..

0
197

खोपोली..

         लायन्स क्लब ऑफ खोपोली समाजात वेगवेगळे उपक्रम राबवित असते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी यात संस्थेचे मोठे योगदान आहे. सामाजिक कार्याच्या याच भावनेतून लायन्स क्लब खोपोली, ऑल फॉर ऑल नेत्रालय, खोपोली यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदु शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी रेल्वे स्टेशन, खोपोली या ठिकाणी पार पडले. या मोफत तपासणी 102 लोकांनी सहभाग घेतला यामध्ये 20 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा लायन शिल्पा मोदी, सचिव लायन संगीता पिल्ले, खजिनदार लायन अनुराधा कट्टी, प्रकल्प प्रमुख लायन अल्पेश शाह, लायन सचिन बोराना, लायन प्रदीप मेहता,लायन नारायण कट्टी,लायन विकास नाईक, लायन सुजित पडवळकर,लायन डॉ. शेखर जांभळे, लायन आतीक खोत, लायन अविनाश राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.

लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने सहकार्य केल्याबद्दल खोपोली रेल्वे स्टेशनचे पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले.