छोटम भोईर यांनी क्रीडाप्रेमींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले-पालकमंत्री अदिती तटकरे

0
55

अलिबाग

छोटम भोईर हे विविध उपक्रम राबवित असताना त्यांनी क्रीडाप्रेमींसाठी एक हक्काचे व्यासपीठ झिराड नगरीत करून दिले आहे.असे प्रतिप्रदान महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी स्व.रमेश पवार क्रीडानगरी येथे केले.

यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच सुजाता माने, मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील, माजी सैनिक दिलीप पाटील , ॲड. के.डी पाटील ,दीपक मोकल वाडगावचे सरपंच सरिता भगत, जयेंद्र भगत, अनिल भिंगारकर, कबड्डी निरीक्षक जनार्दन पाटील , वनअधिकारी शिवाजी जाधव , ॲड. भूपेंद्र पाटील, साई क्रिडा मंडळ व साई महिला मंडळाचे पदाधिकारी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमींना मार्गदर्शन करताना सांगितले की,छोटम भोईर ह्यांच्यासोबत जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून काम करीत असताना एक सहकारी म्हणून काम केले आहे.

छोटम भोईर आज जितके शांत स्वभाव आहे.त्याचा विरुद्ध त्याचा स्वभाव हा जिल्हा परिषदेच्या सभागृहात बघितला आहे.सभागृहात नेहमी झिराड ग्रामपंचायत आणि त्यांच्या मतदारसंघात भेडसावत असणाऱ्या प्रश्नासाठी ते नेहमी आक्रमक देखील असायचे.

छोटम भोईर यांनी कोव्हिडं काळात ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या लसीकरण काळात जिल्ह्यात सर्वात मोठा उपक्रम राबविला होता.त्याचा अभिमान आजही मला आहे.

त्यावेळी मी आणि चित्रलेखा पाटील यांनी भेट दिली होती.छोटम भोईर यांनी विविध प्रकारचे उपक्रम तसेच क्रीडा स्पर्धा राबविल्या आहेत.रायगड जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा ही फक्त पुरुषासाठी नव्हे तर महिलांसाठी सुद्धा एकाच वेळी तीन दिवसीय स्पर्धा आयोजित केली आहे ही बाब मोठी धाडसाची आहे.

याबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जेवढे धन्यवाद देऊ तितके कमी आहे.कबड्डी खेळ हा प्रकाशझोत मध्ये खेळविणे मुश्कील आहे.कारण या खेळात संघातील स्पर्धकांपेक्षा स्पर्धा बघण्यासाठी येणारे प्रेक्षक अधिक आक्रमक असतात.

त्यावेळी आयोजकांनी खरी कसरत असते.यावेळी तीन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करीत छोटम भोईर आणि त्यांच्या सहकारी वर्गानी दाखविलेल्या धाडसाबद्दल सर्वाचे अभिनंदन करीत आहे.

झिराड येथे मुलांना खेळण्यासाठी मैदान नव्हते मात्र ते मैदानाचे काम कोणत्याही निधीची वाट न पाहता हाती घेणे हे मोठे कौतुकास्पद कार्य आहे.या मैदानामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना हक्काचे व्यासपीठ, मैदान उपलब्ध होणार आहे.

समाजासाठी खर्च करण्याची दानत सुद्धा लागते ती दानत छोटमशेठ यांच्याकडे आहे.या स्पर्धेतील उद्घाटनीय सामना महिला गटातील पेण येथील ओमसाई कळवे व मिडलाईन कर्जत संघामध्ये झाला.

तसेच पुरुष गटातील जय हनुमान वाघोडे आणि गावदेवी गोंधळपाडा या संघाचा उद्घाटनीय सामना झाला. कबड्डीचा थरार रात्रभर पहावयास मिळणार आहे. 30 एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या गटातून या स्पर्धा असणार आहेत. ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांना युट्यूबवर ऑनलाईन पहाता येणार आहे.