विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दिपक ब्रदर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांच्या  पुढाकारातून रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने सालाबादप्रमाणे यावर्षीही खोपोली श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवार दि.16 एप्रिल रोजी करण्यात आले.

चार वेगवेगळ्या गटात ६९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.अंतिम स्पर्धेत खोपोली श्री चा विजेता मुंबई पोलीस मधील रोशन खडे ठरला असून, विजेत्यांना व उपविजेत्यांना रोख रक्कम – आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

खोपोली शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर “खोपोली श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मा.ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,किशोर पानसरे,मा.उपनगराध्यक्ष श्रीकांत पुरी,राष्ट्रवादी युवक जिल्हा जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, उपाध्यक्ष शेखर पिंगळे,भूषण पाटील,छत्रपती पुरस्कार विजेते मारूती आडकर, डॉ. शेखर जांभळे, गुरुनाथ साठेलकर, आयोजक विकी गायकवाड,अमित पवार आदि उपस्थित होते.50 ते 55,55 ते 60,60 ते65,65 ते 70,70 खुला गटांमध्ये 69 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.अंतिम फेरीत मुंबई पोलीस रोशन खडे यांने “खोपोली श्री” चा बहुमान पटाविला आहे. तर बेस्ट पोझर सलमान नालबन,बेस्ट बाँडी इंप्रूवमेंट इजाज शेख या विजयी स्पर्धकांना रोख रक्कम – आकर्षक ट्राँफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विजयी स्पर्धकांना मा.नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,मा.नगरसेवक मनेष यादव,सामाजिक कार्यकर्ते रवि रोकडे,राष्ट्रवादीचे विनायक तेलवणे,विशाल गायकवाड,भास्कर लांडगे,राजू गायकवाड,अनिल गायकवाड,प्रशांत मांगुळकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
पंच म्हणून सुनिल नांदे,विजय खरोसे,नितीन शेजवळ,राजु,अंगट,रमेश खरे,धनंजय आगीवले,सिध्दार्थ शिंदे यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सुंत्रचालन घोडके सर व विनोद सोळंकी यांनी केले.