खोपोली- खोपोली शहरातून गहाळ झालेले १० लाख ३८ हजारांचे ७१ मोबाईल मोबाईल मूळमालकांना परत करण्यात आले आहे. खोपोली पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केले कौतुक केले आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रारदारांना न्याय मिळत नाही, असा गैरसमज आहे. तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी सांगत पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या टिमचे कौतुक केले आहे.

खालापूर पोलीस ठाण्यात वार्षिक पोलिस तपासणीसाठी वियशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे आले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ पार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक संजय बांगर आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. खोपोली पोलीस ठाणे हद्दीत २०२४ मध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोनसच्या दाखल झालेल्या तक्रारीचा नावाने आढावा घेऊन त्यांचा शोध घेण्याचे आदेश पीलीस अपोक्षकसोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी दिले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनांप्रमाणे खोपोली पोलीस ठाण्याचे वरिश पोलीस सिक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखालीगुन्हे प्रगटीकरण पथकाचे उपनिमीक्षक अभिजीत गहरीयाले पोलीस कॉनटेबल ए. एच. राठोड यांच्या पथकाने शोध सुरु केला. खोपोली पोलीस ठाण्याच्या हदीमधील गहाळ झालेल्या १७८ मोबाईल फोन्सचा सीआयआर या गोबाईल ट्रेस ऑप्लकेशनच्या माध्यमातून शोध असताना, महाज झालेले मीत्राईल फोन्स पुन्हा ट्रेस करण्यात आले.

पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेले ७१ मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातील वेगवेगळ्या ठिकाणांहून परत मिळविण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त जाले. या पुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनाची एकूण किमा ही १० लाख ३८ हजार ४०० रुपये आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत है सापडलेले मोबाईल मूळ तक्रारदार, मोबाईल फोन मालकांना पाह करण्यात आले आहेत. दरम्यान, खोपोली पोलिसांच्या विशेष कामगिरीचे कौतुक होत आहे. तर गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटले असून, त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.