जन्म.२४ जून नाशिक येथे.
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री ” अनघा अतुल” झी मराठी वरील राम राम महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिसणारे प्रसिद्ध ज्योतिष अतुल भगरे यांनी अनघा ही कन्या. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले.
तिचे शालेय शिक्षण CEO मेरी हायस्कूल मधून पूर्ण झाले असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील SNDT कॉलेज मधून पूर्ण झाले आहे. तिने Mass Communication मध्ये पदवी प्राप्त केली आहे. अनघाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. काॅलेज मध्ये असताना छोट्या मोठ्या एकांकिकामध्ये ती सहभागी व्हायची.
‘कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी’ आणि ‘व्हाट्सएप लग्न’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ ‘कोठारे व्हिजन’ मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता.
झी मराठीवरील दिल दोस्ती दोबारा या मालिकेत तिने काम केले होते. अनघाने अनन्या या नाटकात सहायक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. तिने ‘अनन्या’ या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका हे व्यक्तिरेखा अत्यंत उत्तम रीतीने साकारली होती. अनघाने अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रंग माझा वेगळा ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका तर ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकातूनही ती रंगभूमीवर चमकली आहे.
तिने रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची बहीण श्वेताची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.