सहज निसर्ग शाळेतील विद्यार्थ्यांनी आज अभ्यासानंतर हॉटेलची सफर
सामाजीक कार्यकर्ते ईश्वर शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ट्रीट
सातत्यपूर्ण सहज निसर्ग शाळेचा 18 वा रविवार
रविवार,19 डिसेंबर 2021 रोजी महड व शेडवली येथून सुरुवात झालेल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी असणाऱ्या झाडाखालच्या सहज निसर्ग शाळेत दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी विद्यार्थांची आजवर शिकवलेल्या शिक्षणाची उजळणी करण्यात आली.
खोपोली येथील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये ट्रीट देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना होणारा आनंद अवर्णनीय .. शाळा संपल्यानंतर घरी परतत असताना विद्यार्थी रस्त्याने बडबड गीत गाताना घेणारा आनंद पुढील रविवारी शिकायला येण्यासाठी निश्चित ऊर्जा देतो.
विद्यार्थ्यांना आयुष्यात खूप काही मिळवायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत शिक्षणं घ्यायलाच हवे, हा संदेश दरवेळी त्यांच्या मनावर कोरण्याचे काम सहज निसर्ग शाळेच्या माध्यमातुन होत आहे.
सहजसेवेच्या उपाध्यक्षा इशिका शेलार,कार्यवाह बी.निरंजन, नकुल देशमुख व जयश्री भागेकर यांचे शिक्षकरूपात अमूल्य योगदान.
तसेच सातत्यपूर्ण चालणाऱ्या या सहज निसर्ग शाळेत मनःपूर्वक योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार सहजसेवा फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी मानले