७ मे १९०७ रोजी सुरु झालेली विजेवर चालणारी ट्राम ३१ मार्च १९६४ पासून कायमस्वरूपी बंद करण्यात आली. तब्बल ९० वर्षं जिव्हाळ्याची ठरलेल्या ट्रामला मुंबईकरांनी वाजत गाजत निरोप दिला. शेवटची ट्राम बोरीबंदरहून दादरला रात्री दहा वाजता निघाली. तिला निरोप द्यायला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामध्ये कंटक्टर होते बी. जी. घाटे. मुंबईकरांनी या कंडक्टरचे चक्क ऑटोग्राफ घेतले. एखाद्या कंडक्टरला असा मान पहिल्यांदाच आणि कदाचित शेवटचाच मिळाला असावा. ट्राम बंद झाली आणि मुंबईकर हळहळला. ती अकरा नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती. असं पुलं म्हणाले होते. सहा नंबरची ट्राम कुलाबा ते गिरगाव – फोरास रोडमार्गे धावत होती. खरंच… ट्रामशी मुंबईकरांचं घट्ट नातं जोडलं गेलं होतं.
संकलन.*संजीव वेलणकर पुणे.