शीतल गोळे देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ शाळेच्या शिक्षिका शीतल गोळे देशमुख यांना प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मराठवाड्यातील एक नामांकित संस्था असून दरवर्षी आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कारासाठी निवड केली जाते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतुलजी सावे आमदार, माननीय राज्य मंत्री महसूल यांच्या हस्ते शीतल गोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 2022 प्रदान करण्यात आला.
शीतल गोळे यांची एकूण सेवा 19 वर्ष झाली आहे . त्या सतत नवनवीन उपक्रम राबवत असतात मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम करत असतात. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव देत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांनी फक्त पुस्तकी किडा होण्यापेक्षा त्याला व्यवहार,ज्ञान, कौशल्य, प्राप्त झाली पाहिजेत. आणि त्यांचे नेहमी एक वाक्य असतं की “तुम कुछ भी बनो मुबारक है “ लेकिन इन सबसे पहले तूम एक अच्छा इंसान हो.
शीतल गोळे यांना चित्रकलेची, कविता करण्याची वक्तृत्व तसेच गायनाची आवड आहे. त्या गेली ३३ वर्षापासून अविरतपणे डायरीलेखन करत आहेत. त्यांना गरीब गरजू लोकांना नेहमी सहाय्यता करायला आवडते. वीटभट्टीवर आलेल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांना त्या स्वतः त्याच्या वस्तीत जाऊन शिकवतात.
त्यांना या वर्षीचा आदर्श बी.एल.ओ. उत्तम कार्य केल्याबद्दल ही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्या नेहमी विभागस्थरीय व जिल्हास्थरिय प्रशिक्षण घेऊन इतर शिक्षकांना प्रशिक्षण देत असतात. नेहमी कृतिशील उपक्रम राबवत असतात.
या सर्वांचा विचार करून त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सर्वस्तरातून त्यांचं कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वडवळ शाळेतील सुधाकर थळे यांना व शाळेलाही आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आल