खोपोली…
सहज सेवा फाऊंडेशन सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित असते. नागरीकांच्या गरजा जाणून समाज सेवा ही संस्थेची विश्वासपात्र संस्था आहे. समाजाप्रती झोकून कार्य करणारे पदाधिकारी व सहकारी यामुळे कठीण प्रसंगात सहज सेवा हि जनसामान्यांचे आशेचे स्थान बनलेली आहे.
खोपोली हद्दीतील निधन झालेल्या नागरिकांना निःशुल्क स्वर्ग रथ सेवा व इतर सेवा पुरविताना संस्थेच्या निदर्शनास आले आहे की बऱ्याच ठिकाणी निधन झालेल्या व्यक्तींना फॅमिली डॉक्टर नसल्यास वा रात्री अपरात्री जवळच्या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्यास मृत्यु घोषीत करताना समस्या निर्माण होते.हे लक्षात घेता सहज सेवा फाउंडेशन च्या द्वारा मृत व्यक्तीची मृत्यु घोषीत करण्यासाठी डॉक्टर मार्गदर्शन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सहज सेवा फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालयं, खोपोली येथून दिनांक 02 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला.
या सहज सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, उपाध्यक्षा इशिका शेलार, उपक्रम प्रमुख राजेंद्र फक्के,मार्गदर्शक मोहन केदार, निशिता कार्या, आर्या शिंदे, संचिता पाटील,सागरिका जांभळे,वेदांत मोरे, सोहम ढोकळे,उपस्थित होते.
खोपोलीकरांना भासत असलेली हि अडचण लक्षांत घेवुन दुःखद प्रसंगात निश्चीत उपयोगी पडणारी बाब म्हणुन आपले सूचना व मार्गदर्शन बहुमोल ठरेल असा आशावाद यावेळी सहज सेवा फाउंडेशनचे उपक्रम प्रमुख व मार्गदर्शक राजेंद्र फक्के यांनी व्यक्त केला.