रिलायन्स इंडस्ट्रिजचे माजी कर्णधार, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर राजेंद्र कोंडाळकर यांनी रिलायन्स टाऊनशीप, लोधीवली येथे उत्कृष्ट दर्जाची क्रिकेट अकादमी सुरु केली आहे.
रिलायन्स पाताळगंगा पेट्रोकेमिकल्सचे प्रेसीडेंट आशु गर्ग, एच. आर हेड थॉमस इसो यांच्याहस्ते कोंडाळकर क्रिकेट अकादमीचे उदघाटन करण्यात आले. तसेच या समारंभाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि सेक्रेटरी विनय बहुतुले यांनी उपस्थिती लावली.तसेच रिलायन्स,आरसीएफ आणि टाटा या कंपनीचे माजी क्रिकेटपटू उपस्थित होते.
खालापूर तालुक्यात प्रथमच अद्ययावत क्रिकेट अॅकॅडमी सुरु झाल्याने अनेक होतकरु मुलांना क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी चांगली मदत होणार आहे. राजेंद्र कोंडाळकर हे उत्कृष्ट क्रिकेटपटू असून त्यांच्या मार्गदर्शनात अनेक क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. अधिक माहितीसाठी ९९६७६४८२८८ या क्रमांकावर राजेंद्र कोंडाळकर यांच्याशी संपर्क साधा.