अलिबाग
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील असलेल्या करंजा गावात गायीच्या पोटातून १ – २ किलो नाही तर तब्बल २० किलो प्लास्टिक आणि नट बोल्ट बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.
गेले अनेक दिवसापासून पोट वाढल्याने गायीला दिवसेंदिवस त्रास होत होता. उपचार करूनही ती सतत वेदनेने ओरडत होती. ही वाढती वेदना पाहून उरण येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने मेटल डिटेक्टरद्वारे गाईच्या पोटाची तपासणी केली.
त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. गायीच्या पोटात डॉ.सोमनाथ भोजने, डॉ. महेश शिंदे, डॉ. महेश सावंत व डॉ. अनिल धांडे आदीं डॉक्टर च्या अनुभवी टीमने ऑपरेशनद्वारे गायीच्या पोटातून सुमारे २० किलो प्लास्टिक व धातूच्या वस्तू बाहेर काढून गायीचे प्राण वाचवले. पोटातून बाहेर काढलेल्या वस्तूंमध्ये पिशव्याचे तुकडे, नट बोल्ट ब्लेड इत्यादी वस्तू समाविष्ट होते.