खालापुर तालुक्यातील चौक,तुपगांव,लोधीवली,आसरे या ग्रामपंचायती मध्ये 13 ऑक्टोबरला मतदान होत असून तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या चौक ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना महाविकास आघाडी असा सरळ सामना होत असून यामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचारात आघाडी घेतली असून चौक मध्ये वरचढ असल्याचे सिद्ध केले आहे तर स्थानिक उरण खालापूरचे लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या मोठ्या प्रमाणात विकास निधीतुन चौक गावात विकासाची गंगा वाहणार आहे. विकास कामातून चौकचे रुपडे पालटणार असल्याचे चित्र आहे.चौक ग्रामपंचायतसाठी भारतीय जनता पक्षाच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार गायत्री गणेश कदम या निवडणुक रिंगणात उतरलेल्या असुन सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील दांडगा अनुभव गायत्री गणेश कदम यांना विजयश्री खेचून आणण्यास उपयोगी ठरेल अशी चर्चा आहे.
दरम्यान चौक ग्रामपंचायतमधील पंधरा-वीस वर्षाचा कारभार उलथुन टाकण्याचा चंग भाजपाने बांधला असून कार्यसम्राट लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे व माजी सरपंच गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एक झंझावात निर्माण झाला आहे. आमदार महेश बालदी यांनी दसरा सणाच्या अगोदर सोमवारी संध्याकाळी चौक बाजारपेठेत विविध मान्यवरांच्या भेटी गाठी घेऊन,त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या तर यापुढे चौक ग्रामपंचायत कारभार भाजपच्या हातात द्या आम्ही चौकला सुजलाम सुफलाम करू असा विश्वास मतदारांना दिला उरण खालापूरचे आमदार महेश बालदी,भारतीय जनता पार्टी यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी भेट घेऊन जोमाने काम करण्याचे आवाहन केले.