कर्जत । जागतिक कीर्तीचे तबलावादक झाकिर हुसेन यांचे अमेरिकेत उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने जनता हळहळ व्यक्त करीत आहे. मात्र उस्ताद झाकीर हुसेन यांचे कर्जत शहराशी असलेले नाते हे आगळेवेगळे असल्याने त्यांची आठवण त्यांच्या जाण्याने होत आहे. तर कर्जतचे गजाननबुवा पाटील यांना झाकीर हुसेन यांनी ‘भजन के गोपी कृष्ण’ अशी पदवी दिली होती. कर्जतचे ज्येष्ठ नागरिक विजय हरिश्चंद्रे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या अनेक आठवणी यांना उजाळा दिला आहे. झाकिर हुसेन यांचे कर्जत येथील स्नेही रवि आरेकर यांची आठवण यानिमित्ताने होते. रात्री आयत्यावेळी संगीतप्रेमींची मैफिल बसली, रवि यांच्याकडे तबले होते. परंतु, झाकिर हुसेन यांना हवा तसा तबला आरेकर यांच्याकडे नसल्याने हुसेन यांनी दुसरा तबला उपलब्ध होईल का, अशी मागणी केली. आरेकर यांनी रात्रीच्या वेळी चांगला तबला मिळतो का? यासाठी शोध घेतला. त्यावेळी कर्जतमध्ये हरिश्चंद्रे कुटुंब तबला बनविण्याचे काम करीत असल्याने आरेकर यांनी हरिश्चंद्रे यांच्याकडे तबला मिळू शकतो का, या उद्देशाने त्यांच्याशी संपर्क साधला.
- सहज
- Sahaj Employment
- Sahaj Jahirat Agency
- Sahaj Online Services
- Sahaj Property
- Sahaj Tourism
- Sahaj Vivah Sanstha
- Uncategorized
- शिक्षण कट्टा
- आजचा दिनविशेष
- ताज्या घडामोडी
- ब्लॉग
- महाराष्ट्र
- राष्ट्र
- शिक्षण कट्टा बातम्या
- सहज समाचार
- सहज समाचार बातम्या
- सहज समाचार मुलाखत