खोपोली । शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि सामान्य नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून रात्री उशीरा कामावरून घरी परतणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांमध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे.

भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून दिवसा तेसच रात्रीच्या वेळी वाहनांचा पाठलाग करणे, अंगावर धावून जाणे आणिअचानक वाहनांच्या आडवे येऊन अपघाताला कारणीभूत ठरत आहे.कुत्र्याला चुकविण्याच्या प्रकारात आणि अंगावर वाहन गेल्याने गंभीर अपघात झाल्याच्याघटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न समोर आला आहे.

खोपोली नगर परिषदेच्या लोकसेवकांना नागरिकांची कोणतीच काळजी राहिलेली नसल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत आहेत. शहरात अनेदा कुत्र्यांनी लहान मुलांसह मोठ्यान वर हल्ला करून चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत; पण त्यावर या गांभीर्याने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात खोपोली नगर परिषद असफल राहिली आहे. नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आशी मागणी नागरीक करत आहेत.