खोपोली । खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून या औद्योगिक नगरीत दररोज ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने ही ओव्हरलोड वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरल्याने या ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई व्हावी, अशी मागणी संगम जाधव यांनी केली होती. या मागणीला यश आले असून पनवेल आरटीओ विभागाने खालापूर टोल नाका येथे धडक कारवाई करत वाहनचालकांना दंड ठोठावला आहे, त्यामुळे संगम जाधव यांनी आरटीओच्या या धडाकेबाज कामगिरीचे आभार मानले.

ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई व्हावी यासाठी संगम जाधव शासन दरबारी व आरटीओविभागाला वेळोवेळी पत्र व्यवहार देत कारवाईची मागणी केली होती,तर संगम जाधव यांच्या मागणीची दखल घेत पनवेल आरटीओ विभागाने याआधीही तांबाटी येथे कारवाई केली असता पुन्हा पनवेल आरटीओ विभागाने १० डिसेंबर रोजी सावरोली टोल नाक्यावर कारवाई करत १ लाख ६० हजार दंड वसूल केला केल्याने संगम जाधव यांनी पनवेल आरटीओ विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.