कोकणातील दिंडी खोपोलीतून मार्गस्थ

0
26

खोपोली

कोकणातील दिंडी खोपोली मार्गे मार्गस्थ होत आहेत.खोपोलीत विविध राजकीय, सामाजिक व वैयक्तिक रित्या दिंडीचे जोरदार स्वागत केले जाते. यथाशक्ती सेवा करण्याचे हे भाग्य खोपोलीकरांना नेहमीचं मिळत असते.
खोपोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, खोपोली च्या माध्यमातून श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे निघालेल्या सर्व पायी दिंडीतील वारकरी संप्रदाय उपरणे,स्कार्फ,पाणी बॉटल व बिस्किटांचे वाटप करून वारकरी संप्रदायांचे स्वागत करण्यात आले.यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, खोपोलीचे मा.नगराध्यक्ष दत्ता मसुरकर तसेच कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पायी दिंडीत राष्ट्रवादी नेतेही वारकरी होवून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.त्यामुळे सर्वत्र वातावरण भक्तिमय झाले आहे.