खालापूर : डोक्यावर चापटी का मारली याचा जाब विचाराणा-या मुलाला शिवीगाळी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातावर लाथेने मारुन मनगटाचे वर फैक्चर करुन गंभीर दुखापत केल्याची घटना खोपोली येथे घडली आहे. दोघेही मुले अल्पवयीन आहेत. ७ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा वाजण्याचे दरम्यान जिनयश बिल्डींगचे शिळफाटा समोरील रस्त्यावर पिडीत मुलगा व आरोपी मुलगा हे शिकवणी संपल्यानंतर लिफ्टने खाली येत असताना लिफ्टमध्ये आरोपी मुलाने पिडीत मुलाच्या डोक्यावर चापटी मारल्या. पिडित मुलाने माझ्या डोक्यावर चापटी का मारल्यास याबाबत विचारणा केली असता त्याचा मनात राग धरुन आरोपी मुलाने शिवीगाळी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर दुखापत केली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे अल्पवयीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.