मान्यवरांची मांदियाळी..

रसायनीतील आदर्श व्यक्तिमत्व आणि परीसराच्या विकासाचा विचार करणारे माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.त्यांचा वाढदिवस शुक्रवार दि.5 आॅगस्ट रोजी असल्याने दिवसभरात विविध उपक्रमांत उपस्थित मान्यवरांची मांदियाळी दिसून आली.वाढदिवसानिमित्ताने वरद पतसंस्थेच्या सभागृहात परिसरातील महिला बचत गट,दिव्यांग, जेष्ठ नागरिक, गौरवास्पद कामगिरी करणा-यांचा सन्मान,आदीवासी बांधवांसाठी रोजगार साधन आदी समाजोपयोगी कार्यक्रम पार पडले.याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद आरोग्य माजी सभापती नरेश पाटील, राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अंकीत साखरे,युवक तालुका अध्यक्ष कुमार दिसले आदी उपस्थित होते.यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की ,रसायनीत राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांचे महत्वाचे योगदान आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही नगरपालिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.शिवाय रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसर असल्याने येथे रोजगारानिमित्त व्यवसायासाठी अनेक नागरिक येतात, त्यांना जोपासन्याचे महत्वाचे काम माजी सरपंच संदिप मुंढे करत असताना दिसून येते.

माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम पाहून खासदार सुनील तटकरे यांनी संदिप मुंढे यांची स्तुती करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक भरवला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नविन पोसरी येथील पुर्णंवाद स्वयंसहाय्यता महिला बचत गट,समता स्वयंसहाय्यता महिला बचत गट,मोहोपाडा येथील वासांबे आई महिला बचत गट सोबत पुर्णंवाद महिला बचत गट, मनस्वी महालक्ष्मी महिला बचत गट, श्री गणेश महिला बचत गट यांना घरघंटी वाटप करण्यात आले.तसेच आळी आंबिवली येथील श्रीराम स्वयंसहाय्यता बचत गट, आकांक्षा स्वयंसहाय्यता बचत गट, महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचत गट यांना मसाले कांडप मशिन वाटप करण्यात आले.तर पानशिल येथील श्री प्रसाद महिला बचत गट, नविन पोसरी येथील माऊली बचत गट,श्रवण महिला बचत गट, श्रीराम समर्थ महिला बचत गट,काळणवाडी येथील लोकनाथ महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट आदींना सतरंजी वाटप करण्यात आले.तर लोधिवलीवाडी येथील शांती महिला बचत गट,सखी महिला बचत गट,मुक्ताई महिला बचत गट यांना धुरविरहीत चुल देण्यात आल्या.तसेच वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी बांधवांना मासे पकडण्याचे जाळे,यात पागेर व भिसे मोहोपाडा आदीवासीवाडीतील आत्माराम वाघमारे,गुलाब गोसावी,बेंडू पवार तर शिवनगरविडीतील राम पवार, बाळकृष्ण पवार,रिसवाडी येथील अशोक पवार,खोंडावाडी येथील बाळाराम जाधव,महिंद्र वाघे,खोंडा आदीवासीवाडीतील सुनिल वाघे आदींना मासे पकडण्याचे साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच तामिळनाडू येथील गॅस गळती रोखण्यासाठी रसायनी येथील धनंजय गीध
यांना बोलावून परिस्थितीवर नियंत्रण आणल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तर कोरोना महामारीत स्व:ताचा जीव धोक्यात घालून अॅम्बुलन्स चालविणारे अमित गुजरे व भाऊ कुरंगले यांना सन्मानित करण्यात आले.तसेच कोरोना काळात सायकलवरून व डोक्यावरून घरोघरी सिलेंडर पोहचविणारे संजय तुपे, प्रकाश पिषवणकर, सत्यवान काळेकर, राजेश जांभळे, हरिश्चंद्र पोपेटे, दिनेश कुमार,सलीम खान, ज्ञानेश्वर जाधव,मधुकर मोरे,अशोक गोंधळी, रमाकांत शेलार,संजय शेलार, गणेश कडव,मिथुन राठोड,दौलत आवळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शहा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, रसायनी पाताळगंगा प्रायमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय कुरंगळे, सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनाही सन्मानित करण्यात आले.रसायनी परिसरातील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करुन नागरिकांसाठी मोफत
पॅनकार्डचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
याप्रसंगी प्रभारी सरपंच माधुरी जांभळे,माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे,माजी सभापती गजानन मांडे,मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी,माजी उपसभापती गजानन मांडे,काॅग्रेस आयचे प्रमोद राईलकर , ग्रामसुधार मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम मुंढे,शालेय शिक्षक,रोटरीयन, सर्वपक्षीय पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरद टाॅवर ग्रुपने अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी पाहिले.माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या दिलखुलास स्वभावामुळे शुक्रवारी उशिरापर्यंत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.