पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे आपत्तीकालीन व्यवस्थापन मार्गदर्शन… खालापूर..

0
243

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात नेहमीच जागरूकतेने कार्य करणाऱ्या प्रशासनामुळे कुठल्याही संकटावर वेळीच मात दिली जाते.प्रत्यक्ष संकटात उभे राहून मदत करणारे खालापूर पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्टाफ हे जणु संकटमोचकच.याच संकटमोचकांच्या अर्थातच खालापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दिनांक 17 जुन 2022 रोजी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पाटील यांच्यासाठी विशेष आपत्कालीन मोहिमेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
मान्सून कालावधीत करावयाचे उपाययोजना,नदी,धरणे धबधबे,तलाव या ठिकाणचे आपत्तीकालीन व्यवस्थापन तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारी साधनसामुग्रीचा वापर कशाप्रकारे करता येईल याबाबत तसेच सायबर क्राईम,आगामी सण-उत्सव (बकरी ईद व आषाढी एकादशी) ,सीसीटीव्ही कॅमेरे, गावातील एकाकी राहणारे जेष्ठ नागरिक यांचे बाबत योग्य त्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
सर्वांच्या सहभागातून आपण नक्कीच कुठल्याही आपत्तीवर मात देवू शकतो असा विश्वास यावेळी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी व्यक्त केला.