खोपोली । जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर इकोलावॅगनारची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात खालापूर तालुक्यातील आडोशी गावातील रोशन देशमुख या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

आडोशी गावातील रोशन देशमुख हा कुटुंबासोबत देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेला होता. परतीचा प्रवास करताना शनिवारी रात्री कामशेत येथे त्याच्या इको कारला वॅगनारची धडक बसल्याने तो जबर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रोशन हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोशनच्या पश्चात आई-वडील-पत्नी आणि अडीच वर्षांचा लहान मुलगा आणि भावंडे असा मोठा परिवार आहे.