“कर्जत खालापूरच्या जनतेचे आणि लाडक्या बहिणींचे विशेष आशीर्वाद व प्रेम महेंद्र दादांना मिळत आहे…
सौ.वृषालीताई शिंदे

कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री.महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रचार दौऱ्याची सुरुवात मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी खालापूर तालुक्यातील साजगाव धाकटी पंढरी येथे विठ्ठलाच्या दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर महड येथील वरद विनायकाचे दर्शन घेण्यात आले.

या वेळी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुनबाई व मा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ. वृषालीताई शिंदे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, कर्जत खालापूरची जनता महेंद्र दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदार संघातील सर्व बहिणी महेंद्र दादांना मतदानरूपी आशीर्वाद देतील आणि कर्जत खालापूरमधील लाडक्या बहिणींचे विशेष आशीर्वाद आणि प्रेम त्यांना मिळत राहील. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून, ते प्रचंड बहुमताने निवडून येतील.

तसेच, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबासोबत असलेल्या कौटुंबिक स्नेहसंबंधाच्या आधारावर वृषालीताई या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदारसंघात आल्या आहेत, आणि या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा पुन्हा एकदा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी शिवसेना महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.