चौक
चौक-कर्जत राज्य मार्गावर पडलेले ऑइल यामुळे दुचाकीवरून प्रवास करणारे यांचे होणारे अपघात हातनोली गावच्या प्रदीप गोंधळी यांच्यामुळे पुढे झाले नाही.
चौक-कर्जत या राज्य मार्गावर एन.डी. स्टुडिओ च्या जवळपास ऑइल च्या टँकर मधून मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती.
त्यामुळे दोन दुचाकीवरून प्रवास करणारे ऑइल वरून सरकून पडले,सुदैवाने पुढे वळण असल्याने त्यांच्या दुचाकीची गती कमी होती.
पुढे असेच अपघात होतील याची जाणीव त्यांना झाली, त्यांनी लागलीच ही बाब हातणोली गावच्या प्रदीप गोंधळी यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून सांगितले.
आपल्या कामात व्यस्त असलेले प्रदीप गोंधळी काही वेळातच त्याठिकाणी हजर झाले.
इतरांना मदतीसाठी त्यांनी बोलावले,तोपर्यंत त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली माती ऑइल वर टाकली,संपूर्ण ऑईलवर माती टाकल्यावर त्याची साफसफाई देखील त्यांनी करून होणारे अपघात वाचवले.
त्यांच्या या कामाची माहिती लोकांना मिळताच अनेकांनी भ्रमणध्वनी वरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे धन्यवाद व्यक्त केले.
मुंबई-पुणे रस्त्यावर होणारे अपघात, पावसाळ्यात या परिसरात नदी-धरण क्षेत्रात होणारे अपघातग्रस्तांना ते नेहमीच मदत करीत असतात.