मुस्लिम समाजाने आमदार महेंद्र थोरवे यांना सहकार्य करावे

महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी मुस्लिम समाजाने मतदान करावे – नदीम खान

कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार महेंद्र थोरवे यांनी मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून विकासकामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. दर्गा, मस्जिद, ऊर्दू शाळा, कब्रस्तानासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि दुसऱ्या टप्यात देखील आमदार महेंद्र थोरवे मुस्लिम समाजाच्या विकासाला चालना देतील, तरी मुस्लिम समाजाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी उभे रहावे…20 नोव्हेंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या धनुष्यबाण चिन्हाचे बटण दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन कर्जत शहर संपर्क प्रमुख नदीम खान यांनी केले.