जन्म.१९२९ सिमला येथे.
सतीश भाटिया यांचा जन्म शिमला येथे झाला आणि दिल्लीत त्याचे शिक्षण झाले. जेव्हा त्यांच्या वडीलांचे निधन झाले तेव्हा ते फक्त दहा वर्षांचे होते. काकांनी त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी घेतली.दिल्लीतील प्रतिष्ठित हिंदू महाविद्यालयाचे ते हुशार विद्यार्थी होते पण कुटुंबाची देखभाल करण्यासाठी त्यांना कॉलेज सोडावे लागले. त्यांची लहान बहीण उषा भाटिया (ज्या नंतर मालद्वार चित्रपटाच्या प्रमुख गायिका बनल्या) यांच्यासह ते कार्यक्रमासाठी रेकॉर्ड करण्यासाठी घरापासून १५ दूर किलोमीटर वर असलेल्या ऑल इंडिया रेडिओवर वर चालत जात असत. त्यांचे प्रारंभिक संगीताचे व व्हायोलिनचे प्रशिक्षण प्रख्यात संगीततज्ज्ञ विनय चंद्र मौडगलय यांचे कडे झाले.
त्यांनी गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद केले. पुढे त्यांनी किराणा घराण्यातील जीवनलाल मट्टो कडून शास्त्रीय संगीताचे दहा वर्षे प्रशिक्षण घेतले. ते ऑल इंडिया रेडिओ मधील एकल व्हायोलिन वादक आणि पियानोवादक झाले. संगीतकार म्हणून त्याने अनेक रेकॉर्डिंग व कार्यक्रम केले. पियानो आणि व्हायोलिन व्यतिरिक्त, ते आणखी बरीच वाद्य वाजवू शकत होते.
सतीश भाटिया हे रेडिओ कार्यक्रमाच्यासाठी प्रख्यात संगीतकार होते. वर्षा ऋतु वर आधारित बंदिशीचा त्यांचा अल्बम गाजला होता. या अल्बममध्ये त्यांनी पारंपारिक बंदिशीचा वापर, पारंपारिक वाद्य शैलीचा उपयोग केला होता.
चित्रपट संगीत भाटिया यांनी कमी दिले. १९५० मध्ये आलेल्या ‘मालदार’ या चित्रपटात त्यांनी हेमंत कुमार, रोशन व उषा भाटिया यांच्या कडून गाणी गाऊन घेतली होती. हा चित्रपट चालला नाही. अनेक वर्षाने १९६७ मध्ये व्ही. शांताराम यांनी ‘बूंद जो बन गई मोती’ या चित्रपटाचे संगीत देण्याची जबाबदारी दिली. या चित्रपटाचे संगीत लोकप्रिय झाले होते. मुकेश यांच्या आवाजातील ‘हरी-हरी वसुंधरा पे नीला-नीला ये गगन’ हे भैरवी वर आधारित गाणे आजही प्रसिद्ध आहे.
सतीश भाटिया यांना संगीतातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘सूर सिंगार पुरस्कार’, ‘१९७०साल चा पंजाब सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक’, १९७४ मध्ये बर्लिन येथे ८ व्या आंतरराष्ट्रीय कृषी फिल्म स्पर्धेत सिल्व्हर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले.
मालदार,लाव्हा पुतिया(पंजाबी),बुंद जो बन गये मोती,(या चित्रपटातील “ये कौन चित्रकार है” हे गाणे खूपच गाजले.) हे त्यांचे काही चित्रपट.
सतीश भाटिया यांचे २९ एप्रिल २००५ रोजी निधन झाले.