जन्म. २६ एप्रिल १८९७ कोलकत्ता येथे.
नितीन बोस हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्सचे साठी प्रथम छायालेखक म्हणून काम करत असत. चित्रपटातील पार्श्व गायन हे १९३५ मध्ये ‘भाग्य चक्र’ या नितीन बोस दिग्दर्शित व आर सी बोराल यांनी संगीत दिलेल्या बंगाली चित्रपटातून सुरु झाले होते. यातील गायक केसी डे, पारुल घोष व शुप्रभा सरकार होते. नितीन बोस हे ‘भाग्य चक्र’ या चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘चंडीदास’ या नावाने काढून निष्णात छायालेखकाचे कल्पक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झाले. ‘चंडीदास’ या हिंदी चित्रपटात पण पार्श्व गायनाची सुरुवात केली. १९३० आणि १९४०च्या दशकांत प्रेसिडेंट आणि दुश्मन यांसारखे एकापेक्षा एक सरस त्यांनी चित्रपट दिले. नितीन बोस यांच्या चित्रपटातील तांत्रिक सफाई डोळ्यात भरण्यासारखी असे. नितीन बोस यांनी प्रेक्षकांना भावनाप्रधान करून सोडतील, अशा प्रसंगांची आपल्या ‘गंगा जमुना’ या चित्रपटभर करून ठेवली होती. ‘गंगा जमुना’ तील ग्रामीण हिंदीच्या वापराने त्याकाळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; मात्र निर्मात्यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि हा प्रयोग अपेक्षे पलिकडे यशस्वी ठरला. भारत सरकारने १९७७ साली नितीन बोस यांना दादा साहेब फाळके देऊन गौरव केला होता.‘प्रेसिडेंट’,’कपाल कुंडला’,‘वारिस’,’दूज का चाँद’, ‘गंगा-जमुना’, ‘दीदार’, ‘डाकू मंसूर’, ‘चंडीदास’, ‘धूपछाँव’, ‘जीवन मरण’, ‘दुश्मन’, ‘धरतीमाता’ व ‘मुजरिम’ हे काही नितीन बोस यांचे चित्रपट आहेत. नितीन बोस यांचे १४ एप्रिल १९८६ रोजी निधन झाले.