जन्म. २८ ऑक्टोबर १९५१
४०० वर्षाची परंपरा असलेल्या बनारस घराण्यात जन्मलेल्या पंडित राजन मिश्रा यांना संगीताचे शिक्षण त्यांचे आजोबा पंडित बड़े राम जी मिश्रा व वडील पंडित हनुमान मिश्रा यांच्या कडे झाले. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिली मैफील केली आणि त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड्स, युएसएसआर, सिंगापूर, कतार, बांगलादेश यासह जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी मैफिली केल्या होत्या. काही काळापूर्वी त्यांनी ‘भैरव से भैरवी तक’ या नावाने त्यांची जागतिक संगीत दौरा केला होता. ज्यात त्यांनी १३ देशात ५४ मैफिली एका वर्षात मैफिली केल्या होत्या. भारत सरकारने पद्म भूषण पुरस्कार देऊन पंडित राजन मिश्रा यांचा गौरव केला होता. तसेच तानसेन पुरस्कार, ओंकारनाथ ठाकूर पुरस्कार, काशी गौरव, यश भारती पुरस्कार, असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले. ख्याल गायकी साठी या बंधूना प्रधानमंत्री कडून संस्कृत अवार्ड मिळाले होते, पंडित राजन आणि पंडित सजन मिश्रा यांना अमेरिकेच्या बाल्टिमोर शहराचे मानद नागरिकत्व मिळाले होते. त्यांचे २० हुन अधिक अल्बम प्रसिद्ध झाले. राजन व साजन मिश्रा यांना चित्रपट संगीतात रुची नव्हती,पण लखनऊचे दिग्दर्शक राकेश मंजुल चा चित्रपट- ‘तेरा देश, मेरा देश’ साठी संगीत दिले होते. राजन मिश्रा यांचा विवाह विवाह पंडित दामोदर मिश्र यांनी कन्या ‘बीना’ यांच्या बरोबर झाला होता. राजन यांचे पुत्र – रितेश व रजनीश हे पण गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. पंडित राजन मिश्रा यांचे २५ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.