आम आदमी पार्टीच्या आप जन समस्या निवारण शिबीरास 50 दिवस पुर्ण…
आपचे झाडाखाली असणारे सातत्यपुर्ण शिबिर नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ…
खोपोली…
आम आदमी पार्टी खोपोली परीसरात गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे.समाजातील विविध घटकांना यातुन लाभ होत आहे.डॉ. शेखर जांभळे यांनी तालुका अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून पहिल्याच दिवसापासून नागरीकांच्या समस्या जाणून घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील झाडाखाली बुधवार दिनांक 15 मार्च 2023 पासुन सकाळी 09.00 ते 10.00 यावेळेत आयोजन आहे.सामजिक कार्यात सातत्यपूर्ण ओळख असणार्या डॉ.शेखर जांभळे यांनी राजकीय क्षेत्रातही आपली ओळख सिद्ध केली आहे.कर्जत खालापूर तालुक्याचे प्रभारी डॉ. रियाझ पठाण व खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान तसेच सर्व पदाधिकारी यांच्या सोबतीने या शिबिराने संपुर्ण महाराष्ट्र व भारतात पक्षाला वेगळी ओळख दिली आहे.
50 दिवसापासून सातत्यपूर्ण सुरु असणार्या या शिबिरात 50 पेक्षा जास्त सदस्यांनी आम् आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले आहे.एकूण 46 समस्या जनतेने मांडल्या असुन 38 जणांच्या समस्येचे निराकरण झाले असुन 9 नागरी समस्यावर मार्ग काढण्याचे आम आदमी पार्टीचे प्रयत्न सुरु आहेत. सहजरित्या समस्या मांडण्यासाठी ऊपलब्ध होणारे आपचे पदाधिकारी ही खोपोलीकरांसाठी मोठी उपलब्धि ठरत असून 25 एप्रिल ते 26 एप्रिल रोजी झालेले खोपोली नगरपरिषदेच्या उद्धट अधिकाऱ्यांविरुद्ध यशस्वी उपोषण यामुळे खोपोलीतील जनतेला आप म्हणजे हक्काचे व आपले वाटत आहेत.
खोपोली शहरात प्रभावी बदल घडवण्यासाठी कटिबद्ध असणारे रायगड जिल्हा सल्लागार सुहास देशमुख,कर्जत खालापूर प्रभारी डॉ. रियाझ पठाण, तालुका अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दिन खान,उपाध्यक्ष शिवा शिवचरण,खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड,सैफ खान,सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, शीळफाटा प्रमुख विवेक वाघमारे,भगवान् पवार,शाहनवाज सय्यद,धर्मेंद्र चव्हाण,श्याम देशमुख,कविता खरे,भारती पवार,प्रवीण कोल्हे,अशोक श्रीवास्तव, शादाब सय्यद,हनुमान मानकर,सिकंदर शेख,दिपक कांबळे,प्रसन्न त्रिभुवन, सिकंदर शेख,सारिका कांबळे,गणेश गडद, मनोहर भोसले,यशवंत शेरकर, गणेश ठाकरे, दर्श अटारा यांचे दररोज सुरु असणाऱ्या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे.
आम आदमी पार्टी समाजाच्या हितासाठी करत असलेले काम हे जनतेच्या न्याय हक्कासाठी आहे. रोज येणाऱ्या समस्या यावर पाठपुरावा करीत असताना लवकरच काही प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.जनतेने भक्कम साथ दिल्यास खोपोलीचा चांगल्या रीतीने कायापालट करु असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे तालुका प्रमुख डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.