जन्म.२७ जून पुणे.
नेहा शितोळेने आपले शालेय शिक्षण ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे, मधून पूर्ण केले. तर सर परशुराम कॉलेज पुणे येथून टिळक रोड येथून नेहाने अर्थशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. अगदी लहान वयापासूनच तिला अभिनयाविषयी आवड असल्याने ती कॉलेजमधील विविध कल्चरल कार्यक्रमात भाग घेत असे. नेहाला अभिनयक्षेत्रात करियर करण्यात रस असला तरी तिने या क्षेत्रात जाऊ नये असे तिच्या कुटुंबियांना वाटत होते. नेहाने पालकांचे ऐकून युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली. तिने या दरम्यान अनेक भाषा देखील शिकल्या. भारतीय भाषांसोबतच अनेक पाश्चिमात्य भाषा देखील नेहाला येतात. पण तरीही तिचे मन लागत नव्हते. तिला अभिनयक्षेत्रातच करियर करायचे होते. अखेर तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने अनेक वर्षं स्ट्रगल केल्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. देऊळ हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता.
नेहाने रेडीमिक्स, सुर सपाटा, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध बेवसिरिजमध्ये ती काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली होती. नेहाला बिग बॉसमुळे तर सध्या चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. २०१९ मध्ये ती बिग बॉस मराठी सीझन २ ची अंतिम स्पर्धक होती. मे २०११ मध्ये नेहा शितोळेने मराठी अभिनेता नचिकेत पूर्णपात्रे यांच्या सोबत लग्न केले. नचिकेत प्रसिद्ध अभिनेता असून त्याने कमीने, रॉकी हँडसम, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यांसारख्या हिंदी तसेच झिपऱ्या, अस्तू यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.