आपचा दणका… खोपोली नगरपरिषदेच्या उद्धट बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईने उपोषणाची सांगता..
खोपोली..
करदात्यांशी अरेरावीची भाषा करणारे खोपोली नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी गौतम भगळे व कार्यालयीन अधीक्षक मिनल जाधव यांच्यकडून आम आदमी पार्टीचे पदाधिकारी शिवा शिवचरण यांना उद्धट भाषा वापरल्याबदल निलंबनाच्या कारवाईबाबत आम् आदमी पार्टीकडून निवेदन देण्यात आले होते.या कारवाईबाबत खोपोली नगरपरिषद मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या दालनात आम आदमी पक्षाचे खोपोली खालापूरमधील पदाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून दोन्हीही उद्धट अधिकाऱ्यांवर मुख्याधिकारी ठोस कारवाई न करता जाणीवपूर्वक या अधिकाऱ्यांवर पाठीशी घालून धातूरमातूर कारवाईचे खोटे आश्वासन आम आदमीच्या कार्यकर्यांना देत असल्यामुळे खोपोली खालापूर मधील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दि.25 एप्रिल 2023 पासुन नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले.नागरिकांशी अरेरावीची भाषा करणारे उद्धट व उर्मट वरिल दोन्हीही अधिकाऱ्यांवर जोपर्यंत मुख्याधिकारी ठोस कारवाई करत नाही तो पर्यंत बेमुदत उपोषण सूरुच ठेवणार असल्याची भूमिका आम आदमीचे खालापूर तालुका प्रभारी , खालापूर तालुका प्रमुख डॉ.शेखर जांभळे, खोपोली शहर प्रमूख शिवा शिवचरण व त्यांच्या सर्व कार्यकर्यांनी घेतली होती. या आंदोलनादरम्यान बहुजन युवा पँथर,खोपोली शहर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष,शेतकरी कामगार पक्ष तसेच राजकिय पक्षाच्या संघटना, पत्रकार व जागृत नागरीक यांनी जाहीर पाठिंबा दिला. आम् आदमी पार्टीचे आंदोलन हे जरी पक्षाच्या वतीने असले तरी सर्वसामान्य जनतेशी निगडित असणारा प्रश्न यामुळें या आंदोलनास भरभरून प्रतिसाद मिळाला.
मागण्या मान्य झाल्यावर खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, मा. नगरसेवक नासीर पाटील, खोपोली नगरपरिषदेचे अभियंता नामदेव लगाडे यांच्या हस्ते उपोषणकर्त्याना फळाचा रस देवुन उपोषणाची सांगता करण्यात आली.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कर्जत खालापूर प्रभारी डॉ. रियाझ पठाण, खालापूर तालुका अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, तालुका उपाध्यक्ष सैफ पठाण,खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान,उपाध्यक्ष शिवा शिवचरण, सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, शिळफाटा विभाग अध्यक्ष विवेक वाघमारे,धर्मेंद्र चव्हाण, शाहनवाज सय्यद,श्याम देशमुख, भगवान पवार, गणेश ठाकरे,शादाब सय्यद,गणेश गडद,कविता खेर यांनी अथक परिश्रम घेतले.
आजच्या यशस्वी आंदोलनाने खोपोलीकरांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली आहे. भविष्यात प्रभावीपणे कार्य करीत असताना खोपोलीकरांचे सहकार्य अनमोल ठरेल. या बेमुदत आंदोलनात सहकार्य करणाऱ्या प्रशासकीय संघटना,राजकीय संघटना, सामाजिक संघटना, जागृत नागरीक, पत्रकार तसेच ज्ञात,अज्ञात हितचिंतकाचे मनपुर्वक आभार मानतो असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे खालापूर तालुका प्रमुख डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.





















