रसायनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात भारतीय बौद्ध महासभेचा केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौध्दाचार्य मेळावा संपन्न झाला.यावेळी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विजयजी गायकवाड होत. तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस विजय कांबळे साहेब यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे सरचिटणीस तथा रायगड जिल्हा पालकमंत्री सुशीलजी वाघमारे ,राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजेशजी पवार तसेच महाराष्ट्राचे संरक्षण उपाध्यक्ष हिरवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी संस्कार उपाध्यक्ष राजेश भालेराव, सचिव बंडु कदम, संतोष जाधव, दीपक कांबळे तसेच पर्यटन उपाध्यक्ष गणेशजी कांबळे व संपूर्ण जिल्हा कमिटी यांनी फार मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा कोषाध्यक्ष उषाताई कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सरणतय घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.
या मेळाव्यामध्ये पनवेल, पेन, कर्जत, खोपोली, खालापूर,उरण व अलिबाग या तालुक्यांमधून चांगल्या प्रकारे केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य उपस्थित होते.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय संयम आणि शांततेत पार पडलाच सोबत उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पहायला मिळालं.