लायन्स गार्डन समोरील रस्त्याचे काम न केल्यास आप करणार आंदोलन…

शीळगाव येथील अरुंद रस्त्यावरही अपघात होवु नये यासाठी उपाय योजना करण्याचे आवाहन.

खोपोली

शिळफाटा ते खोपोली दरम्यान मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर लायन्स क्लब ऑफ खोपोली हॉल समोरील रस्त्यावर मागील दोन ते तीन वर्षापासून पाण्याच्या गळतीमुळे मोठे खड्डे पडलेले आहेत.यामुळे सदर ठिकाणी गाडीची अपघात होत असतात. या खड्ड्यामुळे दुर्घटना होऊन भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे याबाबत नगरपरिषद प्रशासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत आम आदमी पार्टीने पत्रव्यवहार देखील केलेला आहे. नगरपरिषद सुद्धा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत गेले दोन वर्षापासून वारंवार पत्रव्यवहार करीत आहे मात्र या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती अद्याप झाली नाही.मोठी दुर्घटना घडल्यावर शासन लाखांमध्ये मदत करते यापेक्षा गांभीर्य समजुन मोठी दुर्घटना झाल्यावर मदत करण्यापेक्षा ती होऊ नये यासाठी उपाययोजना केल्यास जनतेला मोलाचे सहकार्य होऊ शकते यासाठी त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी याकरीता आम आदमी पार्टीतर्फे खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी आम आदमी पार्टीचे कर्जत खालापूर प्रभारी डॉ.रियाज पठाण,खालापूर तालुका अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दिन खान यांनी निवेदन दिले.या संदर्भात त्वरित उपाययोजना न झाल्यास आम आदमी पार्टी तर्फे बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज असून लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.यासोबत शिळफाटा येथील रस्त्यावर शीळगाव येथील रोड रस्त्यावर रस्त्याची रुंदी कमी झाल्याने गाड्या खड्ड्यात जात आहेत या खड्ड्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सूचना नसल्याने व रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणीही वारंवार अपघात होत असतात.आम आदमी पार्टी तर्फे या रस्त्याचे काम सुरू करावे व या ठिकाणी खबरदारीचा बोर्ड लावून जनतेस आव्हान करावे अशी सूचना देखील यावेळी करण्यात आली आहे.
खोपोली परीसरात दररोज सकाळी 09.00 ते 10.00 या वेळेत आप तर्फे सुरू असणाऱ्या आप जन समस्या निवारण शिबीरामुळे जनसामान्यांना नागरी समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असुन जनतेच्या सहकार्याने समस्यावर आम आदमी परखड कामं करेल.या दोन्ही रोडच्या संदर्भात दखल न घेतल्यास आंदोलन करु, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.